Khalapur Maharashtra Raigad

खालापूरातील प्रस्तावित नावंढे एमआयडीसी हद्दपार करणार.

खालापूरातील प्रस्तावित नावंढे एमआयडीसी हद्दपार करणार.
रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांचे शेतकऱ्यांना अश्वासन.

खोपोली -संदीप ओव्हाळ
नावंढे एमआयडीसी रद्द करण्याची मागणी रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी विनंती केली होती याबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरील एमआयडीसीचा पेन्सिलचा शेरा रद्द करण्याचा ठाम शब्द पालक मंत्री ना.आदिती तटकरे यांनी दिला आहे.येत्या दिवसात शेतकऱ्यांच्या जमिनी वरील एमायडीसी रद्द होणार असल्याने येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचे नऊ गावातील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे समितीचे सल्लागार  राजेंद्र येरुणकर व सचिव अरुण नलावडे यांनी सांगितले.
खालापुरातील नांवढे, घोडवली केळवली वांगणी अंजरून हाळ, माणकिवली,कांढरोली तसेच कर्जत तालुक्यातील तळवली अशा नऊ गावांचे सन – 2015 साली राज्य शासनाने सुपीक भातशेती औद्योगिक वापरासाठी एमआयडीसी भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या नांवढे एमआयडिसी मधील नऊ गाव आणि सुधारित वनी बीड जांबरुंग  अशी तीन गावे अशा एकूण बारा गावातील जमीन एमआयडीसीच्या वापरासाठी शासनाने संपादित करण्याचा घाट घातला होता याबाबत येथील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करीत गाव बैठक घेऊन तीव्र विरोध केला होता तर खालापूर तहसील कार्यालयावर न भूतो न भविष्यती असा महामोर्चा काढून शासनाला  हे भूसंपादन रद्द करण्यासाठी विनंती केली होती तसेच शासकीय अधिकाऱ्यांना या नऊ गावांमध्ये फिरण्यास बंधन  केले होते जोपर्यंत आमच्या जमिनीमधील भूसंपादनाचा दाखला रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही असा सज्जड दम दिला होता या आंदोलनाचा धसका घेत तत्कालीन राज्य शासनाने एम आय डी सी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते मात्र हे आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने नावंढे एमआयडीसीमधील नवगाव शेतकरी समितीचे अध्यक्ष शेखर पिंगळे सचिव अरुण नलावडे उपाध्यक्ष  अजीम करंजीकर सचिव किरण हाडप, नऊगाव संघर्ष समितीचे सल्लागार अँड.राजेंद्र येरुणकर,राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे यांनी बुधवारी रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी विनंती केली होती याबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरील एमआयडीसीचा पेन्सिलचा शेरा रद्द करण्याचा ठाम शब्द पालक मंत्री ना. आदिती तटकरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *