खालापूरात थर्टीफस्ट पार्टीवर पोलिस पाटलांची नजर.
उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलिस निरिक्षक अनिल विभुते यांचे आदेश
खोपोली -संदीप ओव्हाळ
कोरोनाचा वाढता प्रार्दुभावामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्रीचा संचारबंदीचे आदेश लागू केल्यामुळे सरत्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी महानगरातील गर्दी खालापूर तालुक्यातील विविध भागात होवू शकते यापार्श्वभूमिवर खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला,खालापूरचे पोलिस निरिक्षक अनिल विभुते यांनी पोलिस पाटलांची बैठक घेत फार्महाऊसवर होणाऱ्या रेव्ह पार्टी तसेच गावात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची जबाबदारी देत थर्टीफस्टवर करडी नजर ठेवण्याचे आदेशच दिले आहेत.
मुंबई,नवी मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्यामुळे नाताळ आणि थर्टीफस्ट साजरी करण्यासाठी महानगरातील गर्दी रायगडत होवू शकते यापार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पोलिसांना सक्त आदेश दिल्यामुळे खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला,खालापूरचे पोलिस निरिक्षक अनिल विभुते यांनी पोलिस पाटलांची बैठक तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती यावेळी खालापूर पोलिस ठाणे अंतर्गतमधील पोलिस पाटील उपस्थित होते.डिवायएसपी संजय शुक्ला यांनी उपस्थित पोलिस पाटीलांच्या आडचणी जाणून घेत खालापूर तालुक्यातील हाँटेल,फार्महाऊस आणि खेड्या गावांमध्ये होण्याची शक्यता असल्यामुळे हाँटेल्स,फार्महाऊस होणाऱ्या रेव्ह पार्टया,सरत्या वर्षाचा आनंद व्यक्त करण्यासाठी रात्रीचे डिजे वाजविणे अशा कार्यक्रमावर बंदी असून गर्दी टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तर खालापूरातील पोलिस पाटलांनी एकत्रित राहून पोलिसांना सहकार्य करा,आपणाला लागेल ती मदत करणार असल्याचे अश्वासन खालापूरचे पोलिस निरिक्षक अनिल विभुते यांनी देत प्रत्येक पोलिस पाटलांचा वाढदिवस साजरा करणार असून वर्षभरात जो पोलिस पाटील उत्तम काम करेल त्यांची सत्कार करणार असल्याची संकल्पना मांडत सरत्या वर्षाच्या स्वागता दरम्यान गावात चांगले वातावरण ठेवण्याचे अवाहन केले आहे.
पोलिस पाटीलांना फक्त निवडणुकी दरम्यान बोलविले जाते एरव्ही कोणी विचारत घेतले जात नाही मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलिस निरिक्षक अनिल विभुते यांनी पोलिस पाटलांची बैठक लावून अडीआडचणी जाणून घेतल्याबद्दल पोलिस पाटील तालुकाध्यक्ष अनंता ठोबंरे यांनी पोलिस आधिकाऱ्यांचे आभार मानले.