मंडलातील संघटनात्मक काम, कार्यक्रम, आंदोलन, निवडणूक याबाबत जिल्हा व मंडल यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.याकरीता जिल्हाध्यक्ष मान. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष, पनवेल भाजपा पक्ष प्रवक्ता व पनवेल महानगरपालीकेतील अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले नगरसेवक प्रकाशजी बिनेदार यांची कर्जत तालुका भाजपाच्या ‘सपर्क प्रमूख’ पदाची महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. एका अनुसूचित जातीच्या व्यक्तिला महत्वाच्या जबाबदारीवर नेमण्यात आले आहे! याबद्दल भाजपा पदाधिकारी व अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी यांनी नगरसेवक प्रकाशजी बिनेदार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नगरसेवक प्रकाशजी बिनेदार हे कर्जत तालुक्यातील भाजपाचे संघटन मजबूत करतील, अशी सर्वांना खात्री आहे. यापुर्वी पक्षाने त्यांना खोपोली नगरपालिका निवडणूकीची जबाबदारी सोपविली होती. ती त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली होती.
Addvertisment