Khopoli Maharashtra Politics Raigad RSJPRSNL

खोपोली शहरात भाजपा तर्फे प्लास्टिक मुक्ती संकल्प कापडी पिशव्या वाटप.

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम संपूर्ण देशात साजरा करण्यात आला. दिव्यांगाना कुत्रिम अवयव, गरीब वस्त्यांमध्ये व रुग्णांना फळे वाटप, प्लाझ्मा दान, रक्त दान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, बुद्धिजीवी व प्रवृध्द नागरिकांसाठी
कॉन्फरन्स, पं. दीनदयाल उपाध्याय जी यांची जयंती कार्यक्रम, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान, आत्मनिर्भर भारत वक्तृत्व स्पर्धा, मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप आशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याच कार्यक्रमाअंतर्गत खोपोली शहरात भाजपा तर्फे गुरुवारी प्लास्टिक मुक्ती संकल्पचे आयोजन करण्यात आले होते. खोपोली बाजार पेठ, भाजी मार्केट व खोपोली शहरातील प्रभागान मध्ये कापडी पिशव्या वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रमुख प्रमोद पिंगळे व सह प्रमुख चंद्रअप्पा अनिवार यांना जवाबदारी देण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, भाजपचे युवा नेते राहुल जाधव, दिलीप पवार, सरचिटणीस ईश्वर शिंपी, संजय म्हात्रे, सुमिता महर्षी, स्नेहल सावंत, हेमंत नांदे, गोपाळ बावस्कर, गणेश ठाकरे, वाघ, ध्रुव मेहेंदळे, राकेश दबके, मिश्रा जी, सुधीर मुंढे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पद्धधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.

Advertisment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *