Maharashtra Navi-Mumbai Politics

पंतप्रधान नरेंद्र मोदी व जिल्हा युवती अध्यक्ष सौ. सुहासिनी नायडू यांचे वाढदिवसा निमित्ताने नेरुळमध्ये विविध कार्यक्रम.

संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. नवी मुंबई नेरुळमध्ये देखील भाजपा युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी पंतप्रधानांच्या व स्वतःच्या जन्मदिनानीमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

17 सप्टेंबर रोजी महापालिका सफाई कर्मचारी,अतिक्रमण कर्मचारी, आरोग्य विभाग फवारणी कर्मचारी तसेच गटार काम करणारे कामगार यांचे सत्कार हे सन्मान प्रमाणपत्र व तांदूळ, तेल व फळ वाटप करून करण्यात आले तसेच 18 सप्टेंबर नायडू यांचे वाढदिवसा निमित्ताने प्रभागात नागरिकांना तांदूळ, 50 लिटर तेल व भाज्या वाटप करण्यात आले. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटण्यात आल्या. यासोबत प्रभागातील 20 स्थानिकांचे दुचाकी अपघाती विमा काढून देण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करून विविध ठिकाणी रोपे लावण्यात आली. येत्या काळात पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने त्यांची निगा देखील राखली जाणार आहे. कोविडमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसॊबत विविध कामाद्वारे स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांमध्ये जनजागृती करणारे पालिका कर्मचारी , कोविडकाळात काम करणारे योद्धांचे सत्कार खूप कौतुकास्पद केले.

Addvertisment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *