राज्य सरकारने अद्याप मंदिरं खुली केलेली नाहीत. परिणामी, राज्यातील भाविक भक्तांना आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी मुकावे लागत आहे. कोरोनासोबत जगावे लागेल, अशी जनजागृती करणाऱ्या सरकारने मंदिरं खुली करावीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळ बंद केली होती. मात्र, ‘अनलॉक’मध्ये मंदिरं अद्याप खुली केली नाहीत. त्यामुळे खोपोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी विविध धार्मिक ठिकाणी घंटानाद आंदोलन केले.
भाजपाचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार सर्वत्र ठिकाणी मंदिरे खुली करण्यासाठी घंटा नाद आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने खोपोली शहरात भारतीय जनता पार्टी सोशल मिडिया उत्तर रायगड सह-संयोजक राहुल जाधव, खोपोली भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, गीता मोहित, बुथ अध्यक्ष राजू वेल्हे, अनिल अनिवार, दत्ता कदम, शेखर सुतार यांनी राठवडे येथे आंदोलन केले.श
हरातील इतर मंदिरांमध्ये माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, शहर अध्यक्ष इंदारमल खंडेलवाल, नगरसेवक तुकारामसेठ साबळे, नगरसेविका अपर्णा मोरे जिल्हा आध्यात्मिक सेल संयोजक काशीनाथ पारठे, हेमंत नांदे, संजय म्हात्रे, सुनील नांदे, अनिल करणूक, अजय इंगुलकर, संतोष चौधरी, प्रमोद वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Addvertisment