मुळगाव सातारा जिल्ह्यापासून वर्षानुवर्षे धार्मिक परंपरा असलायल्या गौरीचा भेटीला ग्रामदेवता जानाई- इंजाई आज मानकरी यांचा घरी गेल्या. गौरवीपुजनच्या दिवशी ग्रामदेवतेचा मुक्काम तिथेच राहील. कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये ववंढल या गावी पुनर्वसन झालेल्या गावांपैकी कोयना जांब्रूक हे गाव.
“आज या ठिकाणी येऊन 61 वर्षाचा कालावधी लोटला गाव, तालुका, जिल्हा राहणीमा सर्वच बदलले. पण वर्षानुवर्षे ग्रामदैवत- कुलदैवत यांचा धर्मीकविधी नित्यनेमाने गावकरी करीत असतात. सातारा जिल्ह्यातील जांब्रूक या गावापासून सुरु असलेल्या परंपरा आजही जपली जाते.
भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम भागात असताना देखील सुरु असलेली परंपरा सुरू आहॆ. गौराई आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मानकरी मधुकर जयसिंगराव कदम यांच्या घरी आई इंजाई तर राजेंद्र अनंतराव कदम यांच्या घरी आई जानाई यांचे आगमन होते. आई इंजाई ही देव्हाऱ्यात तर आई जानाई गौरी जवळ बसते. मंदिरातून ग्रामस्थ मानकरी यांचा घरी रुपी घेऊन जातात. दरवर्षी सर्व ग्रामस्थ देव घेऊन जातात.”
या वर्षी कोरोनामुळे ग्रामस्थांनी नेमून दिलेल्या लोकांनीच देवकार्य केले. शासकीय नियमांचे पालन करूनच कार्यक्रम सुरू आहॆत. दोन्ही देवींची स्थापना झाली की पूजा व आरती होते, त्यानंतर गावात घरी असलेल्या गौराईला ओवसने सुरू होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा या रुपी मंदिरात आणल्या जातात. वर्षनुवर्षे सुरू असलेल्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात ग्रामस्थांचा हातभार असतो.