Khopoli Maharashtra Raigad

खालापुर युवा (ॲडव्होकेट) बार असोसिएशन अध्यक्ष पदी अ‍ॅड. संदेश साहेबराव धावारे यांची निवड.

खालापूर युवा (ॲडव्होकेट) बार असोसिएशनच्या १५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत 2020-2021या वर्षा करीता अ‍ॅड.संदेश साहेबराव धावारे याची अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली . असा ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आला. सदर निवड ही बिनविरोध झाली असुन सन्माननीय अ‍ॅड.विकास म्हात्रे, अ‍ॅड.उमेश पवार, अ‍ॅड.आनंद गायकवाड, अ‍ॅड. सचिन चाळके, अ‍ॅड. मानकवळे तसेच सर्व सदस्य याच्या देखरेखीखाली करण्यात आली असुन अ‍ॅड. संदेश साहेबराव धावारे यांची निवड झाल्या मुळे सर्व वकील सहकार्या मध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
त्यांना त्यांचा मित्र परिवार, राजकीय, विविध क्षेत्रातील सामाजिक व इतर संघटनांन कडून शुभेच्छा देण्यात येत आहॆत.

Addvertisment

Addvertisment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *