Maharashtra Navi-Mumbai

गणेशोत्सवात पालिकेने प्रत्येक विभागात नवी मुंबई महानगर पालिकेने कृत्रिम तलावाची उभारणी करावी : भाजपा युवती मोर्चा अध्यक्षा सुहासिनी नायडू यांची मागणी.

राज्याचा आवडता सण गणेशोत्सव जवळ येतोय. नवी मुंबईत देखील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या गावी जाता येणार नसल्याने आपल्या घरीच अनेकजण गणेशाची स्थापना करण्याची शक्यता आहे. मात्र याचा परिणाम सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या विसर्जनावेळी होणार असून त्यामुळे, भक्तांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने प्रत्येक विभागात वॉर्डानिहाय कृत्रिम तलाव तयार करावेत त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होऊन, पालिकेवरचा व पोलिसांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच गर्दीतून वाढणारा संसर्ग रोखणे पालिकेला शक्य होणार आहे. तसेच तलावातील पाणी स्वच्छ राहून पालिकेचा गाळ काढण्याकरिता लागणारा पैसा देखील वाचेल. त्यामुळे नवी मुंबई महानगर पालिकेने याबाबत गांभीर्याने घेऊन वॉर्डनिहाय कृत्रिम तलाव तयार करावेत अशी मागणी नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे भाजपा युवती मोर्चा अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी पत्राद्वारे केली आहे.

Addvertisment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *