Khopoli Politics Raigad

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस खोपोली शहरात साजरा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खोपोली शहरात अनेक ठिकाणी जागतिक महामारी कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्य नागरिक घाबरलेले असल्याने त्याची आंतरिक ताकद वाढवण्यासाठी ARSENIC ALBUM 30 या आयुर्वेदिक गोळ्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप खोपोली शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अनिलदादा मिंडे सर्व पद्धकारी व कार्यकर्त्यांनी खोपोली येथील पाटणकर चौक, स्टेट बँक ऑफ इंडिया,बस स्टॅड,शिळफाटा,दिपक हाॅटेल चौक,मस्को गेट वासरंग या ठिकाणी या गोळ्याचे वाटप केले.

पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचा आदेश होता की शुभेच्छा देण्यासाठी मुबई ला न येता आपआपल्या शहरात लोकाहिताची कामे करा हाच आदेश मानुन शहर अध्यक्ष अनिलदादा मिंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी जितेद्र पाटील (रायगड जिल्हा अध्यक्ष), जे.पी पाटील (रायगड जिल्हा उपाध्यक्ष), सचिन कर्णुक (खालापुर तालुका अध्यक्ष) त्याच प्रमाणे विविध क्षेत्रातील खोपोलीतील समाजिक व राजकिय कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवुन मोलाचे सहकार्य केले. त्याच प्रमाणे हुसेन शेख, तानाजी मालकर,सचिन गुरसळ,धनंजय अमृते,गणेश गाढवे, इक्बाल शेख,नाथा पाटील,सतिश येरूणकर, व खोपोली शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी आंबवणे अशा अनेक कार्यकर्त्यानी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Advertisment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *