Maharashtra Politics

कोकणच्या मदतीला भाजपा : 14 ट्रक मदतसामुग्री रवाना…कोकणवासियांना सर्व ती मदत करणार : देवेंद्र फडणवीस

Spread the love

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात ‘कोकणच्या मदतीला भाजपा’ हे अभियान भाजपाने हाती घेतले. जनसहभागातून गोळा झालेली आणि भाजपाच्या वतीने 14 ट्रक मदतसामुग्री आज मुंबई, ठाणे, पनवेल येथून कोकणला रवाना झाली.
या मदतसामुग्रीत अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, कोळसा, सिमेंटचे पत्रे, ताडपत्री, सोलर कंदिल, मेणबत्ती, माचिस आदींचा समावेश आहे. मला आनंद आहे की, गेल्या दोन दिवसांत ही मदत ठिकठिकाणांहून गोळा करण्यात आली आणि पहिली खेप आज रवाना झाली.
कोेकणावर आलेले हे संकट मोठे आहे आणि या संकटात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कोकणवासियांच्या पाठिशी उभी आहे. अन्नधान्य, भाजीपाला याव्यतिरिक्त वीजेसाठी सोलर कंदिल आणि पावसाळा लक्षात घेता निवार्‍यासाठी ताडपत्री आणि सिमेंट पत्रे यावर भर देण्यात आला आहे. हा उपक्रम यापुढेही असाच सुरू राहील.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढाजी, राहुल नार्वेकर, सुनील राणे, अमित साटम आणि अन्य सहकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *